हिंगोली (Woman hunger strike) : तालुक्यातील कारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विषयासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होत नसल्यामुळे गेल्या ११ दिवसांपासून उपोषणास बसलेल्या (Woman hunger strike) महिलेची प्रशासनाकडून दखल घेतल्या गेली नाही. परिणामी सदर महिलेने जिल्हाधिकार्यांना निवेदन देत इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
कारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत मंदाकिनी बालाजी टोम्पे यांनी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सदर याचिका दाखल करून अनेक महिने उलटले तरी याबाबत प्रशासनाने कुठलीच सुनावणी घेतली नाही. यापूर्वी देखील टोम्पे यांनी उपोषणाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु त्यानंतर केवळ आश्वासन देऊन प्रशासनाने उपोषण सोडविले. त्यानंतरही सुनावणी न झाल्यामुळे अखेर मंदाकिनी टोम्पे या पुन्हा उपोषणास बसले आहेत. अकरा दिवस उलटून देखील प्रशासनाने त्यांच्या (Woman hunger strike) उपोषणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे वैतागून त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करीत मरणाची परवानगी देण्याची मागणी केली आहे. यानंतर तरी प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देईल काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.