हिंगोली (Hingoli Yellow Alert) : जिल्ह्यातून जाणाऱ्या पैनगंगा आणि पूर्णा नद्यांवरील प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. तसेच मुंबई वेधशाळेच्या वतीने पुढील पाच दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट (Hingoli Yellow Alert) जाहिर केला असून प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काही दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पाऊस (Hingoli Yellow Alert) पुन्हा सक्रीय होत आहे. १० सप्टेंबर पासून काही ठिकाणी झाला होता. तर मुंबई वेधशाळेच्या वतीने पुढील पाच दिवस जिल्ह्यात येलो अलर्ट जाहिर केला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील तिन्ही धरणाचा आढावा घेतला असता ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, इसापूर धरणाचे १५ पैकी ५ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून ५,१०७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सुरू आहे. सिद्धेश्वर प्रकल्पातून मुख्य दरवाज्याद्वारे ४,९३५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तर येलदरी प्रकल्प, जिंतूर (परभणी): येलदरी धरणाच्या वरच्या बाजूने पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाचे गेट क्र. १ आणि १० हे ०.५ मीटरने उघडण्यात आले. यातून ४,२१९.९४ क्युसेक्स (११९.४९६ क्युमेक्स) पाणी पूर्णा नदीत सोडले जात आहे. याव्यतिरिक्त, विद्युत निर्मिती केंद्रातूनही २,७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणातून एकूण ६,९२० क्युसेक्स (१९६ क्युमेक्स) पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जात आहे.