औंढा नागनाथ (Hingoli) : औंढा नागनाथ येथील हिंगोली परभणी राज्य रस्त्यालगत, औंढा नागनाथ शहरातील बस स्थानका समोरील मार्तंड पान टपरीस (Paan Tapri) दिनांक 12 एप्रिल शनिवार रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने (Short Circuit) अचानक आग लागली. पाहता-पाहताच टपरीतून आगीचे लोळ बाहेर आले. यानंतर, तात्काळ औंढा नागनाथ नगरपंचायतच्या अग्निशामक दलास (Fire Brigade) पाचारण केले. रुद्र रूप धारण केलेल्या, आगीवर अग्निशामक दलाने पाण्याचा फवारा मारत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने, मोठा अनर्थ टळला. राज्य रस्त्यालगतच घटना घडल्याने व या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असल्याने, पोलीस निरीक्षक (Inspector of Police) जी. एस राहीरे सह कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान, टपरी चालकाचे फ्रिज व इतर साहित्य जळून अंदाजे साठ हजार रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याचे, मार्तंड पान शॉप चालक विनोद बाबु मुधळकर यांनी सांगितले.