जिल्हा परिषदेचे पाच शिक्षक सन्मानित!
बुलढाणा (Vinoba App) : जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा (बा) ॲपच्या (Vinoba App) माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावेळी पाच शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.Honored for excellence i
सप्टेंबर महिन्यात बुलढाणा जिल्हा स्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते शिक्षक अनुराधा शरद नागरे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिरपुर, विद्या गुलाबचंद चवरे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवपुर, सायदा परविन सैय्यद अफरोज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा देऊलघाट, आणि शेख मतीन शेख नझिर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा दे. घाट, परवेझ उस्मान शेख जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा रायपुर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सदरील पुरस्कार पंचायत समिती बुलढाणाचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी सौ. माधुरी मुकुंद मेमाणे, विस्तार अधिकारी वंदना टकाळकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला बुलढाणा गट साधन केंद्र मधील कर्मचारी आणि (Vinoba App) आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमचे जिल्हा समन्वयक प्रशांत सुभाष पाटील उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व तालुक्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणा द्यावी अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करण्यात आली.