हिंगोली (BJP Blood Donation) : भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला पालकमंत्री ना. नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती होती या शिबिराला रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला.
भारतीय जनता पार्टी जिल्हा हिंगोलीच्या वतीने पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज 17 सप्टेंबर रोजी (BJP Blood Donation) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
या सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत 17 फेब्रुवारी रोजी शहरातील जलेश्वर मंदीर येथे महाआरती करण्यात आली. तसेच यांच परिसरातीच स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाआरती, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
यावेळी माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे आमदार तान्हाजीराव मुटकुळे, माजी आ. रामराव वडकुते, भाजपाचे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, जिल्हा सरचिटणीस डॉ. उमेश नागरे , रजनिश पुरोहीत ,मानिक लोंडे, पवन उपाध्याय, संजय ढोके, शशिकांत वडकुते, पद्माकर नायक, श्रीरंग राठोड, हनुमान कराळे ,संदीप वाकडे, बाबा घुगे, संजय खंडेलवाल, श्याम खंडेलवाल, सुनिताताई मुळे, कृष्णा रुहाटीया ,मंदाकिनी चव्हाण कविताताई इमडे, विजय धाकतोडे , नारायण खेडकर, नंदकिशोर खिल्लारे, विठ्ठल सांगळे, दिपक सानप, गुड्डू देवकते आदीची उपस्थिती होती.