हिंगोली (Hingoli Wrestling) : येथील श्री सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने ३० सप्टेंबर मंगळवार रोजी भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो मल्लांनी सहभाग नोंदविला होता.
हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर (Hingoli Wrestling) कुस्त्यांचे आयोजन ३० सप्टेंबरला करण्यात आले होते. या कुस्त्यांसाठी लाखो रूपयांचे पारितोषीके ठेवण्यात आली होती. कुस्त्यांचे आयोजक हिंगोली जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भरत चौधरी पहेलवान हे होते. या कुस्तीचे उद्घाटन आमदार संतोष बांगर, शिवाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक गणेश बांगर, माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे, बाबु कदम पहेलवान, जम्मु यादव पहेलवान, गोपाल मोटे, पवन मंडले, अभिजीत पवार, दिनेश चौधरी, कपिल खंडेलवाल पहेलवान, जावेद प्यारेवाले आदींची उपस्थिती होती.
या (Hingoli Wrestling) कुस्त्यांसाठी प्रथम पारितोषीक व मानाचा फेटा, चांदीची गदा ५१ हजार रुपये, व्दितीय पारितोषीक ३१ हजार रुपये व तृतीय पारितोषीक २१ हजार रुपये ठेवण्यात आले होते. यासोबतच इतर अनेक कुस्त्यांसाठी पारितोषीक ठेवण्यात आली होती. या कुस्त्यांकरीता ११ लाख ११ हजार रुपयांचे पारितोषीके विजेत्या मल्लांकरीता ठेवण्यात आले होते. या कुस्त्यांच्या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यासह परिसरातील शेकडो मल्ल सहभागी झाले होते. या कुस्त्यांकरीता मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती होती. कुठेही अनुचित घटना घडू नये, या करीता पोलिस निरीक्षक संदिप मोदे यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत या कुस्त्या सुरू होत्या.




 
			
