Ner : शहरातील बंसीलॉन येथे शेतकरी कर्जमुक्ती सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी हक्कांसाठी ज्वलंत भाषण केले. यावेळी मंचावर विपिन चौधरी, गौरव नाईकर, संतोष अरसोड, रवि मानव मनोहर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
नेर येथे बच्चू कडू यांचे शेतकरी कर्जमुक्ती सभेत प्रतिपादन
यावेळी कार्यक्रमादरम्यान लेखक संतोष अडसोड यांचा शाल – श्रीफळ देऊन सत्कार (felicitation) करण्यात आला. तसेच २७ जिल्ह्यांतून सायकलद्वारे ५ हजार किलोमीटर प्रवास करून जनजागृती (Public awareness) करणार्या रवी मानव यांचा देखील शाल- श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कर्जमुक्ती सभेत बोलताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले की, ‘शेतकरी आत्महत्या रोज वाढत आहेत, पण सत्ताधारी फक्त हरीतक्रांतीच्या घोषणा करतात. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्यांचे हाल पाहूनही सरकारला वेदना होत नाहीत का? जातीच्या नावाखाली लोकांना झेंडे द्यायचे, पण शेतकर्यांचा झेंडा मात्र खाली टाकायला लावायचा हेच आजचे राजकारण आहे.
‘शेतकरी राजा अजूनही पेटत नाही’…
’ते पुढे म्हणाले की, ‘शेतकरी राजा अजूनही पेटत नाही. जातधर्माची निष्ठा त्याला जागू देत नाही. कितीतरी वेळा आंदोलने व उपोषणे केली, पण माझा एकच उद्देश आहे – शेतकरी जागा व्हावा. सत्ता माझ्या डोक्यात कधी जाणार नाही. शासनाला जाब विचारण्यासाठी शेतकर्यांनी एकत्र यायला हवे.’ तर शेतकर्यांच्या शेत पिकाला हमीभाव भाव मिळावा, ही शेतकर्यांची प्रमुख मागणी असल्याचे कडू यांनी ठामपणे सांगितले. शासन गटबाजी करून शेतकर्यांना एकत्र येऊ देत नाही आणि त्यामुळे त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. तर उद्योजकांचे कर्ज माफ केले जाते.शेवटी त्यांनी शेतकर्यांना आवाहन केले की, ‘२८ सप्टेंबर रोजी बूटीबोरी येथील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. ही लढाई भेदभावाची नसून मालाच्या योग्य भावाची आहे. शेतकरी जागा झाला तर सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही.’ तर यावेळी साहेबराव येवले, मनोहर राठोड, भास्करराव टभाले, सुभाष मेश्राम, प्रमोद कातोरकर, कपिल देशमुख, श्रीकांत ठाकरे, शुभम भेंडे, पंकज खानझोडे उपस्थित होते.