मानोरा (Illegal Murum) : तालुक्यातील अभईखेडा येथील डोंगरगांव शिवारात २ ते ३ जेसीबी मशीन व १२ ते १५ ट्रॅक्टरच्या सहाय्याने रात्र दिवस मुरूम उत्खनन सुरू आहे. २० ब्रासची रॉयल्टी भरून हजारो ब्रासची उत्खलन कोट्यवधी रुपयांच्या (Illegal Murum) मुरुमाचे उत्खनन राजरोसपणे सुरू आहे. हजारो ब्रास मुरूम उचलून अनधिकृतपणे त्याची वाहतूक केली जात आहे. महसूल अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी व तलाठी याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष करताना दिसत आहे . तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष केंद्रीत करून कार्यवाही करावी, अश्या मागणीचे तक्रार निवेदन जिल्हाधिकारी यांना प्रहार सेवक चेतन पवार यांच्यासह इतरांनी पाठविले आहे.
निवेदनानुसार मानोरा येथील अभईखेडा नजीक डोंगरगांव शिवारात ३ ते ४ जेसीबी मशीन व १२ ते १५ ट्रॅक्टरच्या सहाय्याने दिवसरात्र मुरूम उत्खनन सुरू आहे. येथून खुलेआम हजारो ब्रास मुरूमाची वाहतूक ट्रॅक्टरने केली जात आहे. नाममात्र रॉयल्टी भरून शेकडो ब्रास दबावापोटी कागदी घोडे नाचवून हा प्रकार सुरू आहे. रॉयल्टीपनी दाखवल्या गेलेले चार ट्रॅक्टर आणि खुलेआम चाललेले १५ ट्रॅक्टरमात्र, त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा (Illegal Murum) महसूल बुडत असून, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मानोरा येथील डोंगरगांव वरून (Illegal Murum) अवैध मुरूम वाहतूक केली जात आहे. मायनिंग नसल्या क्षेत्रातून होत असलेल्या उत्खननाला अधिकाऱ्यांचा पाठबळ आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. दोन ते तीन जेसीबीच्या सहाय्याने होत असलेल्या दहा ते पंधरा ट्रॅक्टरने मुरूम उत्खननाने मानोरा येथील बाजार समितीतील एक शेड टाकण्यात आहे. तिथे मुरूम टाकण्यात आलेला असून त्यांची रॉयल्टी चेक करून त्या मुरुमाची लांबी व रुंदी करून किती प्रमाणात किती ब्रास मुरुम टाकल्या गेलेला आहे. याचा पंचनामा होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणीचे तक्रार निवेदन जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनावर लकी चव्हाण, उमेश राठोड व अविनाश डोंगरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रतिलिपी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ, उपविभागीय अधिकारी महसूल व तहसीलदार यांना पाठविल्याचे निवेदनात नमूद केले आहे.