ट्रॅक्टर ताब्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल…!
परभणी/गंगाखेड (Illegal sand theft) : गोदावरी नदी पात्रातून विना परवाना वाळू उपसा करून वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत एकाविरुद्ध गंगाखेड पोलीस (Gangakhed Police) ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला असुन तालुक्यातुन होणारे (Illegal sand theft) अवैध वाळू, मुरूम, माती आदी गौण खनिज उत्खनन थांबविण्यासाठी महसूल प्रशासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतून होत आहे.
गंगाखेड तालुक्यातील मसला शिवारातील गोदावरी नदी पात्रातून विना परवाना (Illegal sand theft) वाळू उपसा करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सोमवार २४ मार्च रोजी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे (Gangakhed Police) पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार लक्ष्मण कांगणे, परसराम गायकवाड, शरद सावंत, बिट जमादार संभाजी शिंदे, दिलीप निलपत्रेवार, सावंत आदींनी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास मसला शिवारात सापळा लावून गोदावरी नदी पात्रातून वाळू घेऊन येणारा ट्रॅक्टर थांबवून चालक रणजित राजकुमार देशमुख रा. पिंप्री यांच्याकडे वाळूच्या परवान्या बाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळून आल्याने वाळूसह ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर गंगाखेड पोलीस ठाण्यात आणत पो. शि. शरद सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रणजित राजकुमार देशमुख यांच्या विरुद्ध (Illegal sand theft) वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास (Gangakhed Police) पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड हे करीत आहेत.