मानोरा(Washim):- परभणी येथील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळयासमोरील संविधान प्रतिकृतीचे तोडफोड करणाऱ्या समाज कंटकाला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावे. तसेच त्यांच्या पाठीशी जे लोक ऊभे आहेत. त्यांना सि बी आय (CBI)चौकशी करुन तातडीने अटक करुन, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला लाऊन, शासनाने कठोर शिक्षा करावी. सदर घटनेच्या निषेधार्थ मानोरा येथे दि. २० डिसेंबर रोजी पंचायत समिती कार्यालय ते तहसील पर्यंत मोर्चा काढून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रकृतीची तोडफोड करणे ही घटना अतिशय निदंनीय घटना
निवेदनात नमूद केले आहे की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रकृतीची तोडफोड करणे ही घटना अतिशय निदंनीय घटना असुन भारतीय संविधानाचा अपमान आहे. त्यामुळे दोषीविरूध्द गुन्हा दाखल कडक कार्यवाही करण्याचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात नंदु वानखडे, प्रकाश चक्रनारायन, विनोद राठोड, दिपक खडसे, आनंदा खुळे, तुषार भगत, अरुण इंगळे, वंदना इंगळे, बाळासाहेब डेरे, संतोष ढले, गोलू वायले, नालंदा चक्रनारायण सतिष सोनोने, सिधू शिकारे, निलिताई ढोले, प्रफुल खडसे, मनिष उजवे, श्याम भुरे आदीसह युवक वर्ग मोर्चात सहभागी झाले होते.