हिंगोली (Hingoli District Court) : येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आणि मुख्य न्यायदंडाधिकारी या न्यायालयाचे तसेच नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन २२ फेब्रुवारीला होणार आहे. या सोहळ्याला सर्वोच्च न्यालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई यांच्यासह अनेक न्यायमुर्तिंची उपस्थिती राहणार आहे.
२२ फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी १०.३० वाजता नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ति भूषण रा. गवई यांच्या हस्ते येथील प्रमुख (Hingoli District Court) जिल्हा व सत्र न्यायाधिश आणि मुख्य न्यायदंडाधिकारी या न्यायालयाचे तसेच नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्य अतिथी नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ति प्रसन्ना भा. वराळे व सन्मानिय अतिथी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ति अलोक आराधे, रविंद्र वि.घुगे, नितीन वा. सांबरे, नितीन भ. सुर्यवंशी यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ति यनशिवराज गो. खोब्रागडे, परभणी प्रमुख (Hingoli District Court) जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती उज्वला म. नंदेश्वर आणि हिंगोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तुफानसिंग स्व. अकाली यांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन हिंगोलीचे जिल्हा न्यायाधिश – १ व अतिरिक्त राजेंद्र वि. लोखंडे, जिल्हा वकील संघाचे अॅड. सुनिल रा. भुक्तार यांनी केले आहे. या सोहळ्या निमित्त जय्यत तयारी करण्यात येत आहे.यासोबतच नव्याने बांधण्यात आलेल्या 11 हजार 170 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या नवीन प्रशस्त न्यायालयीन ईमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या (Hingoli District Court) ईमारतीमध्ये 20 प्रशस्त कोर्ट हॉल, लिफ्ट आणि दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष सुविधेसह स्वतंत्र पार्किंग आणि बागेसाठी जागा आहे अशी माहिती प्रबंधक, जिल्हा न्यायालय, परभणी यांनी दिली आहे.
अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जून्या इमारतीमध्ये कामकाजाचा शेवटचा दिवस
हिंगोली येथे निजामाच्या काळात सन १९३१ मध्ये मुनशिब कोर्ट (प्रथम न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर) हे न्यायालय सुरू करण्यात आले होते. कालांतराने सन १९८९ मध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय या ठिकाणी सुरू करण्यात आले. त्यानंतर सन १९९० मध्ये हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये अनेक वर्ष कामकाज करण्यात आले. आता प्रमुख (Hingoli District Court) जिल्हा व सत्र आणि मुख्य न्यायदंडाधिकारी या न्यायालयांचे तसेच नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन २२ फेबु्रवारीला होणार आहे. त्यामुळे आज २१ फेबु्रवारी शुक्रवारी रोजी न्यायालयाच्या जून्या इमारतीमध्ये कार्यालयीन कामकाजाचा अंतिम दिवस राहणार आहे. त्यानंतर शनिवार व रविवारी सुट्टी राहणार आहे.