हिंगोली (Chintamani Ganapati) : शहरातील प्रसिद्ध चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने गर्दी करतात. मात्र यावर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले आहे. (Chintamani Ganapati) गणपती मंदिराच्या प्रमुख रस्त्यावर चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने भक्तांना मंदिराकडे जातांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सध्या गणेश उत्सव निमित्त दररोज दर्शनासाठी येणार्या नागरिकांना वाहनतळापासून ते (Chintamani Ganapati) मंदिर परिसरात पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनांसाठी नियोजनाचा अभाव, रस्त्यावरील वाहतूक कोंडी, आणि जागोजागी बॅरीकेटींग लावलेली वाहनं – हे सगळं भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रासदायक ठरत आहे.
मंदिर परिसरात वाहतुकीचा कुठलाही ठोस आराखडा नसल्याने वाहन धारकांची मोठी कसरत सुरू आहे. वाहन तळाची सध्या व्यवस्था नसल्यामुळे बाहेर गावाहून येणार्या अनेक भाविकांची वाहने रस्त्याच्या कडेला लावली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. हिंगोली शहर वाहतूक पोलिसांनी बॅरीकेटींग लावून वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मंदिर परिसरात कोणतीही पूर्वतयारी न झाल्यामुळे आणि वाहनांसाठी योग्य जागा उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारक संतप्त आहेत. गणेश उत्सव सुरू होऊन अनेक दिवस उलटले.
परंतु दर्शनास येणारे अनेक भाविक मंदिराच्या जवळपास वाहने आणन्याचा प्रयत्न करीत असताना प्रत्येक वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्याचा परिणाम बाजारपेठ मधील व्यवसायावर देखील होत आहे. अशावेळी महावीर स्तंभ, महात्मा गांधी चौक या ठिकाणी पोलिसांनी बॅरीकेटींग लावून मंदिर मार्गाकडे जाणारी चारचाकी वाहने रामलिला मैदानावर उभी करण्याकरीता पाठविण्याची गरज आहे. आज परिस्थिीत ही चारचाकी वाहने येत असल्याने पादचारी भाविकांना वाहनांची कोंडी बाजूला सारून गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याकरीता धडपड करावी लागत आहे.