कळमनुरी (Isapur dam) : ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज मंगळवार, (दि. २६) रोजी रात्री ८ वाजता ३ दरवाजे अर्धा मीटरपर्यंत उचलण्यात आले असून, नदीपात्रात ४ हजार ९८८ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला असल्याचे (Isapur dam) धरण पूरनियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.
सद्यस्थितीत ईसापूर धरणाच्या सांडव्याचे ३ गेट ०.५० मीटरने चालू असून एकूण ३ गेटद्वारे पैनगंगा नदीपात्रात ४९८८ क्यूसेक्स (१४१.२२९ क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू आहे. (Isapur dam) धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन (Isapur dam) ईसापूर धरण पूरनियंत्रण कक्षाने केले आहे.




