ध्वजारोहणाचा कार्यक्रम हा अपंग व्यक्तीच्या हस्ते पार पाडला!
बार्शी टाकली (Independence Day) : बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा गावात स्वातंत्र्य दिनाला अपंग व्यक्तीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आळंदा गावातील येथे माजी सैनिक दत्ता ढोरे हे जेव्हापासून ग्राम मंडळाचे (Village Board) अध्यक्ष पद सांभाळले तेव्हापासून ते आगळे वेगळे उपक्रम राबवतात. नेहमीप्रमाणे स्वतः ध्वजारोहण न करता याही वर्षी ध्वजारोहणाचा (Flag Hoisting) कार्यक्रम हा अपंग (Disabled) व्यक्तीच्या हस्ते पार पाडला. यापूर्वी शहिदांच्या वडिलांच्या हस्ते, तसेच गावामध्ये सर्वप्रथम पाणीपट्टी आणि घरपट्टी भरणाऱ्या व्यक्तींकडून, तसेच कार्यरत सैनिक माजी सैनिक, यांच्याकडूनच ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्याकरिता त्यांनी स्वतःच्या सहीने पत्र काढून गावातील जन्मताच विकलांग असलेले विशाल राहुल मोहोड या युवकाला त्यांनी ध्वजारोहणाचा मान दिला.
गावातील लोकांकडून सर्वतोपरी ‘या’ निर्णयाचे स्वागत!
यावर्षी शासनाने (Government) तीन दिवस ध्वजारोहण करण्याचा उपक्रम राबविला असल्याकारणाने पहिला दिवशी त्यांनी आपल्या ग्राम मंडळाचे कर्मचारी महादेव मोहोड यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. तसेच दुसऱ्या दिवशी ग्राम मंडळाचे पाणीपुरवठा कर्मचारी विनोद खंडारे यांच्या हस्ते केले आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त अपंग असलेल्या विशालच्या हस्ते ध्वजारोहण केले. हा उपक्रम राबवत असताना गावातील लोकांकडून सर्वतोपरी या निर्णयाचे स्वागत होत आहे. स्वतःचा अधिकार दुसऱ्याला दिला आणि तेही जन्मताच अपंग असलेल्या व्यक्तीला त्यामुळे त्याचे आई-वडील तसेच विशाल याच्या डोळ्यातून आनंदआश्रू वाहले. या कार्यक्रमाला ग्राम मंडळाचे अध्यक्ष दत्ता ढोरे तसेच उपाध्यक्ष विश्वनाथ जानोरकर सदस्य श्री दयाराम खाडे,श्री ज्ञानेश्वर सुलताने, चि. सागर मोहोड, सौ.सोनाली नवलकार, सौ. सुरेखा बेद्रे, पोलीस पाटील सुनील खाडे, ग्राम मंडळाचे माजी अध्यक्ष बंडू पाटील ढोरे, दिगांबर म्हैसने, ग्रामपंचायत अधिकारी श्रद्धा ननीर, ग्राम महसूल अधिकारी प्रवीण ताले, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापक मोना मानिकराव, तसेच सर्व शिक्षक वृंद, शाळेतील विद्यार्थी (Students), गावातील प्रतिष्ठित नागरिक (Citizens), तसेच महिला पदाधिकारी बहुसंख्य लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. अपंग व्यक्ती यांचे मनोबल वाढवून त्यांना पुढे जीवन जगण्याचे प्रोत्साहन मिळावं, याकरिता हा उपक्रम राबवला. असं मत ग्राम मंडळाचे अध्यक्ष तथा माजी सैनिक दत्ता ढोरे यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.