भारतीय दंड संहिता 2023 अंतर्गत कलम 103(1) अन्वये गुन्हा वाढवण्यात आला!
परभणी (Infant Case) : परभणीत चालत्या ट्रॅव्हल्समधून अर्भक फेकून देत त्याची गुप्तपणे विल्हेवाट लावल्याच्या संतापजनक घटनेप्रकरणी परभणीतील पाथरी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आता भारतीय दंड संहिता 2023 अंतर्गत कलम 103(1) अन्वये गुन्हा वाढवण्यात आला आहे. या प्रकरणात अल्ताफ मेहनुद्दीन शेख (वय 21) रा. साकला प्लॉट, परभणी यास अटक (Arrested) करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी दिली आहे.
तरुणीने चालत्या ट्रॅव्हल्समधून कपड्यात गुंडाळून रस्त्यावर फेकले!
घटना मंगळवार 15 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पाथरी-सेलू रोडवर उघडकीस आली होती. एक अर्भक रस्त्यावर मृतावस्थेत आढळले होते. पोलिस तपासात उघड झाले की, अर्भक एका तरुणीने चालत्या ट्रॅव्हल्समधून कपड्यात गुंडाळून रस्त्यावर फेकले होते. अर्भकाच्या (Infant) संगोपनाची जबाबदारी न स्वीकारता हे कृत्य करण्यात आले होते. या घटनेप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल जैस्वाल यांनी फिर्याद दिल्यानंतर, पाथरी पोलिसात (Pathari Police) संबंधित तरुणी व तरुणावर सुरुवातीला गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला होता. पुढील तपास पोउपनि शेख हे करीत आहेत.