संगीत, नृत्य आणि स्त्रीशक्तीचा जल्लोष; दोन दिवस रंगला सांस्कृतिक उत्सव
अमरावती (Women College Garba) : नूतन विदर्भ शिक्षण मंडळ द्वारा संचालित महिला महाविद्यालय, जोग चौक, अमरावती येथे दिनांक ४ व ५ ऑक्टोबर २०२५ रोजी आंतरमहाविद्यालयीन व आंतरशालेय गरबा नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. पारंपरिक पोशाखांतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या रंगतदार गरब्यांनी परिसर दुमदुमून गेला होता.
उद्घाटन समारंभाचे (Women College Garba) अध्यक्ष संस्थेचे सचिव प्रा. हितेश व्यास तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष मा. डाॅ. संगीताताई शिंदे उपस्थित होत्या. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य मा. डॉ. अरुणा वाडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करत सर्व आयोजक प्राध्यापकांचे कौतुक केले.
तर डाॅ. संगीताताई शिंदे म्हणाल्या, “महिला शक्ती जागृत होणे ही काळाची गरज आहे. महाविद्यालयाने मुलींना आपल्या कलेला आणि आत्मविश्वासाला वाव देणारा सुंदर मंच उपलब्ध करून दिला आहे. या क्षणाचे सोने करा आणि समाजात अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभ्या रहा असे मत त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
प्रा. हितेश व्यास यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्व प्राध्यापकांचे या आयोजनाकरिता अभिनंदन केले.या प्रसंगी पर्यवेक्षिका प्रा. माधुरी सोनपरोते, प्रा. सौ. ममता पांडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी प्रथम पारितोषिक माजी पालकमंत्री मा. यशोमती ठाकूर यांच्या कडून देण्यात आले.द्वितीय पारितोषिक वामन हरी पेठे ज्वेलर्स कडून देण्यात आले.तृतीय पारितोषिक डॉ. परवानी यांच्या कडून देण्यात आले. तर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रा. एकनाथ तट्टे यांच्या कडून देण्यात आले.
आंतरमहाविद्यालयीन गटातून महिला महाविद्यालय ज्युनिअर कॉलेज ने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय नूतन कन्या शाळा, तृतीय क्रमांक शिवाजी जुनिअर कॉलेज व उत्तेजनार्थ ब्रिजलाल बियाणी जुनिअर कॉलेज नी पटकवला मान्यवरांच्या हस्ते विजेत्या गटाला पारितोषिक देण्यात आले.
बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून पूनम फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक च्या संचालिका सौ. शिल्पा अग्रवाल , तसेच दैनिक विदर्भ प्रजासत्ताक च्या संचालिका व संपादिका डॉ. शुभांगी जोशी उपस्थित होत्या.
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शर्मिला देशमुख यांनी केले. गरबा स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. गोकुळ देशमुख व डॉ. ऋतुजा देशमुख यांनी केले,
तर बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी पिंपळकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. अंकुश गिरी, प्रा. गोकुळ देशमुख, प्रा. डाॅ. जयश्री वैष्णव, प्रा. रोशन दाभेकर, कविता नेवारे, अमृता भोरे, वैष्णवी वाघ, मधुरा ठाकरे, वैजयश्री गडीकर, दिपाली चिरांगे, रवीना राऊत, सोनाली धांडे, प्रियंका चौधरी, सोनाली पांडे, कविता गावंडे, जगबंधू वानखडे, रोशन अपसर, शारदा घाटोळ ,रेणुका गणेशे शितल हिवे आणि माधुरी गायकवाड या सर्व प्राध्यापक व प्राध्यापकांनी अथक प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाला अमरावती शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. दोन दिवस चाललेल्या या गरबा महोत्सवाने महिला महाविद्यालयात संस्कृती, उत्साह आणि स्त्रीशक्तीचा नवा संदेश दिला.
स्पर्धेत 10 गटांचा सहभाग
या (Women College Garba) स्पर्धेत एकूण १० गटांनी सहभाग नोंदविला. पारंपरिक व आधुनिक तालावर सादर झालेल्या गरब्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. आकर्षक पोशाख, तालबद्ध नृत्य आणि सर्जनशील सादरीकरणांच्या आधारे परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली.