Yawatmal :- नगर परिषद (City council)निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दहा नगर परिषदेच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर चुका व विसंगती झाल्याचे उघड झाले आहे. अनेक पात्र मतदारांची नावे वगळल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तर अनेक नागरिकांचे मतदान स्वतःच्या प्रभागातून दुसर्या प्रभागात गेलेले असल्याने मतदारयादीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून त्याबाबतचे आक्षेप नुकतेच दाखल करण्यात आले आहे. प्रारुप मतदार यादीच्या दाखल आक्षेपांची शहानिशा सुरु झाली आहे,आक्षेप निकाली काढून ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी
८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील दहा नगर परिषदेच्या प्रभागातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती तर १४ ऑक्टोबर रोजी या यादीवर आक्षेप घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती मात्र मतदार यादीतील गोंधळ बघता १७ ऑक्टोबर पर्यंत मतदार यादीवर आक्षेप घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. शुक्रवारी आक्षेप घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील नगर पालिकेच्या (Municipalities) प्रारूप मतदार यादीवर विक्रमी संख्येने आलेले आक्षेप मतदार यादीतील गोंधळ स्पष्ट करत होते. मात्र आक्षेपांच्या शेवटच्या दिवशी नंतर प्रशासन कामाला लागले असून जिल्ह्यातील नगर पालिकेच्या कर्मचार्यांन सोबत बिएलओ आता नागरिकांच्या आक्षेपांची घरोघरी जाऊन पाहाणी करत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यांतील निवडणूक असलेल्या नगर परिषदेच्या श्रेत्रात दिसून येत आहे.
यवतमाळ नगर परिषद प्रशासन व महसूल प्रशासनाने नागरिकांच्या आक्षेंपावर मार्ग काढण्यासाठी आक्षेप दाखल करणार्या मतदारांच्या घरापर्यंत नगर परिषद कर्मचारी व बिएलओ यांना पाठवून आक्षेप असलेल्या नागरिकांच्या स्वाक्षरी व माहिती नगर परिषद प्रशासन व महसूल प्रशासनाने घेणे सुरू केले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाला अत्यंत अल्प कालावधीमध्ये आक्षेप निकाली काढण्याचे दिव्य पार करायचे आहे.