हिंगोली (Hingoli Burglary) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोड्या करणार्या अट्टल गुन्हेगारास जेरबंद केले असून दोन गुन्हे उघड केले आहेत.या चोरट्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. २३ एप्रिलला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगोली ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. नर्सी नामदेव पोलिस ठाणे हद्दीतील चोरीच्या (Hingoli Burglary) घटनेतील आरोपी लिंबाळा मक्ता येथे राहत्या घरी असल्याचे समजताच पथकाने मधुकर पंडित काळे याला ताब्यात घेतले.
त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून नगदी सात हजार रुपये, सिपीयु, एक सीसीटिव्ही व डिव्हीआर असा एकूण २७ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याने (Hingoli Burglary) ही घरफोडी मुकेश गंगाधर गाडे रा. दर्गा मोहल्ला कुरुंदा याच्या सोबत मिळून केल्याचे सांगितले.
ही (Hingoli Burglary) कारवाई प्रभारी पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक कपिल आगलावे, कोंडबा मगरे, नितीन गोरे, विकी कुंदनानी, गजानन पोकळे, किशोर कातकडे, निरंजन नलवार, आकाश टापरे, विठ्ठल काळे, नरेंद्र साळवे, साईनाथ कंठे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, इरफान पठाण, प्रदिप झुंगरे यांच्या पथकाने केली आहे.




 
			 
		

