Chandrapur :- गावतलावा लगत शौचास गेलेल्या व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यु (Death)झाल्याची घटना सोमवार रोजी पहाटे ५-३० वाजताच्या सुमारास उघड़किस आली. शंकर विठोबा मोहूर्ले (७५) असे मृतकाचे नाव असून तो चकपिरंजी येथील रहिवाशी होता. घटनेच्या दिवशी नेहमी प्रमाणे शौचास जातो म्हणून पहाटे तो गावा नजिक असलेल्या तलावात गेला होता. मात्र त्याचा तलावात (Lake) बुडून मृत्यु झाला.लागलीच गावातील मंडळी पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले. तलावातील शोधानंतर मृतकाचे शव उत्तरीय तपासणासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.