नवी दिल्ली () : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सीमा पोलीस दलात नोकरी मिळण्याची ही सुवर्णसंधी आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) ने अनेक रिक्त जागेसाठी भरती सुरु होत आहे. विशेष म्हणजे 10वी पास उमेदवारही या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2024 मध्ये (ITBP Recruitment) इच्छुक असलेले उमेदवार 6 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती पात्रता, पोस्ट माहिती, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सुरू : 8 ऑक्टोबर 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 नोव्हेंबर 2024
फी भरण्याची शेवटची तारीख: 6 नोव्हेंबर 2024
परीक्षेची तारीख: वेळापत्रकानुसार
प्रवेशपत्र उपलब्ध: परीक्षेपूर्वी
निकाल उपलब्ध: लवकरच कळवले जाईल
अर्ज फी:
सामान्य / OBC / EWS : 100/-
SC/ST/माजी सैनिक: 0/-
सर्व श्रेणीतील महिला: ०/-
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, ई चलन द्वारे परीक्षा शुल्क भरा.
वयोमर्यादा:
किमान वय: 21 वर्षे
कमाल वय: 27 वर्षे
ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती नियम 2024 नुसार वयात सूट दिली जाणार आहे.
रिक्त जागा तपशील:
एकूण पदे: ५४५
पदाचे नाव: ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर
ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर पात्रता:
भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वीची परीक्षा उत्तीर्ण. (ITBP Recruitment) याशिवाय जड वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे बंधनकारक आहे.