रिसोड (Risod) :- शासनाचा बहुआयामी जलतारा प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्हा परिषद (Zilla Parishad) उच्च प्राथमिक केंद्र शाळा निजामपूर येथे करण्यात आली. सर्वच स्तरातून या योजनेस सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या प्रकल्पास नुकतीच तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी भेट देऊन पाहणी केली व शाळा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या या योजनेची स्तुती केली व समाधान व्यक्त केले.
पावसाळ्यात नक्कीच या योजनेमुळे जमिनीमध्ये पाणी शोषले जाईल
ग्रामपंचायत निजामपूरच्या वतीने जलतारा प्रकल्पाची अंमलबजावणी जि.प.शाळेत करण्यात आली. शाळेत विविध ठिकाणी शोषखड्डे तयार करण्यात आले असून त्यामध्ये दगड भरण्यात आले. वॉटर हार्वेस्टिंग चे (Water harvesting) पाणी या खड्ड्यामध्ये पडेल अशी व्यवस्था करण्यात आली. येत्या पावसाळ्यात नक्कीच या योजनेमुळे जमिनीमध्ये पाणी शोषले जाईल व शाळा परिसरातील छोटी मोठी झाडे आणखी बहरतील व बोअरवेलच्या पाण्याचीपातळी पण वाढेल असा आशावाद तहसीलदार तेजनकर यांनी व्यक्त केला. मुख्याध्यापक अर्जुन वरघट यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती उपस्थित मान्यवरांना सांगितली. याप्रसंगी शाळेतील शिक्षक अरविंद इंगोले, पुष्पा संबळे, धीरज जाधव, वाबळे आदी शिक्षकांची उपस्थिती होती.