शक्तिपीठ महामार्ग ऐवजी सिंचनाचा अनुशेष भरून उद्योगामध्ये भर टाकण्याची केली मागणी
कळमनुरी (Shaktipeeth Highway) : राज्य शासनाने जाहीर केलेला शक्तिपीठ महामार्ग हा कळमनुरी तालुक्यातील आठ गावातून जाणार असून आठ गावे या महामार्गामुळे उद्ध्वस्त होत असल्याने या गावातील शेतकऱ्यांचे जीवन संकटात आले असल्याने कळमनुरी तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गास (Shaktipeeth Highway) मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने विरोध करण्यात आला असून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्द करून हिंगोली जिल्ह्याच्या सिंचनाचा अनुशेष भरून उद्योगांमध्ये भर टाकावी, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दि.४ जुलै रोजी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शक्तिपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातून जात असून (Shaktipeeth Highway) शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी संकटात सापडलेले आहेत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आठ गावे या महामार्गामुळे उद्ध्वस्त होत आहेत तसेच वसमत तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे एकमेव उत्पन्नाचे साधने शेती असून ज्या भागातून हा महामार्ग जात आहे तेथील शेतजमिनी जात असल्याने शेतकऱ्यांचे जीवन संकटात येणार आहे ज्या भागातून हा महामार्ग जात आहे.
तेथील पूर्ण प्रकल्प व अप्पर पैनगंगा प्रकल्पाचा लाभ क्षेत्राखाली या तालुक्यातील जमीन संपूर्ण बागायती असून हळद व केळी ही पिके घेतली जातात व जिल्ह्यातील हळद परदेशात सुद्धा निर्यात केली जाते पूर्वीचा नागपूर कोल्हापूर महामार्ग असून सुद्धा त्याला समांतर दुसरा (Shaktipeeth Highway) शक्तीपीठ महामार्ग कशासाठी करण्यात येत आहे हा प्रश्न या भागातील शेतकरी बांधवांना पडला आहे अगोदरच हिंगोली जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने मोठ्या प्रमाणात भूमहीन मजुरांचे स्थलांतर परत जात होत आहे.
यासाठी हिंगोली जिल्ह्यात मोठा उद्योग आणून सुरक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्यावे व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन (Shaktipeeth Highway) शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा तसेच हिंगोली जिल्ह्यांमध्ये सिंचनाचा अनुशेष भरून उद्योगांमध्ये भर टाकावी अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर मराठवाडा जनता विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.रामदास धांडे, तालुकाध्यक्ष डॉ.सतीश पाचपुते, अरुण वाढवे, अॅड.गुणानंद पतंगे, बबन डुकरे,उत्तम पातोडे,कमलाजी मोडक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.