जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघ निवडणुक प्रचारात रंगत
परभणी (Jintur-Selu Assembly) : जिंतूर सेलू – विधानसभा मतदार संघात प्रचाराला रंगत चढत असतांना उमेदवारांच्या प्रत्यक्ष भेटी गावपातळीवर जाऊन घेतल्या जात आहेत. विद्यमान आ.मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी आपल्या गावाला यावे व भेट द्यावी म्हणून अनेक गावातील ग्रामस्थ त्यांची वाट पाहत आहेत. समस्या मांडण्यासाठी त्यांनाही संधी मिळावी या निमित्त असे बोलल्या जात आहे.
पाच वर्षात आ.मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी विकासाची कामे केलीत तरीही विकासांचा बॅक लॉक बाकी आहे. मतदार संघात आज प्रचार यंत्रणेत विविध मुद्दे घेतले जात आहेत. विकासाचा मुद्दाही तेवढाच महत्वाचा असल्याचे मतदार बोलून दाखवत आहेत. आता प्रचाराला सुरूवात झाली असून उमेदवार हे गावा – गावात जाऊन मतदारांच्या भेटी घेतांना दिसत आहेत. ग्रामस्थांच्या समस्या काय आहेत ? हे समजून घेत आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रस्ते, विज या प्रश्नांसोबत सोयाबीन व कापसाला भाव नाही हे मुद्दे देखील तेवढेच ग्रामीण मतदार संघात चर्चेत आहे. त्यामुळे आ.मेघना बोर्डीकर यांनी आमच्या गावाला भेट द्यावी, अशी मतदार संघातील प्रत्येक गावाची इच्छा आहे.
लढतीमध्ये जातीवाद वाढतोय
सेलू : जिंतूर विधानसभा मतदार संघात (Jintur-Selu Assembly) तिरंगी लढत आहे. यामध्ये महायुतीकडून मेघना बोर्डीकर, महाविकास आघाडीकडून विजय भांबळे व वंचितकडून सुरेश नागरे अशी लढत होत आहे. मतदार संघात मराठा विरुध्द ओबीसी हा वाद वाढतच जात आहे. या वादात कोणाची तरी एकाची माती होणार हे निश्चित आहे. कारण मतदार हा तिघांनाही चांगल्या प्रकारे ओळखत आहे.