अल्पसंख्यांक आयोगाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर कारवाईस वेग!
कळमनुरी (Kalmanuri) : मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात नगरपालिका प्रशासनाने (Municipal Administration) मूलभूत सुविधा कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, तसेच रमजान ईदच्या दिवशीही ईदगाह परिसरात कोणतेही सुख सुविधा दिली नाही, तसेच शहरातही स्वच्छता न केल्याची तक्रार अल्पसंख्यांक आयोगाकडे (Minorities Commission) करण्यात आली होती, या तक्रारीची दखल घेऊन अल्पसंख्यांक आयोगाने याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र जिल्हा अधिकारी यांना देण्यात आल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) कळमनुरी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांच्याकडे सोपविली यानंतर कळमनुरी उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) यांनी दि. 30 एप्रिल रोजी तक्रारदार व नगरपालिका प्रशासनाची बाजू ऐकण्यासाठी सुनावणी घेतली यामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली परंतु तक्रारदारांचे वकील ॲड. तुषार पवार कळमनुरी शहरात मूलभूत सुविधांचा कसा बोजवारा उडाला आहे. याचा पुराव्यासह युक्तिवाद केला. यानंतर, उपविभागीय अधिकाऱ्यांनी शहरातील मूलभूत सुविधेचा आढावा दि. 3 मे रोजी घेणार असल्याचे सांगितले. यामुळे नगरपालिका प्रशासनाची चांगलीच भांबेरी उडाली असून, नगरपालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या तीन-तीन महिन्यापासून जाण आल्यांची सफाई करण्यात आली नव्हती. त्या नाल्यांची सफाई करण्याचे काम हाती घेतले आहे उपविभागीय अधिकारी यांनी पूर्ण शहरात भेटी दिल्याचे सांगितल्यानंतर, शहरातील अनेक भागात घाणीचे साम्राज्य व नागरिकांना पाण्यासाठी करावी लागत असलेली, भटकंती त्यांना दिसणार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
शुक्रवारच्या नमाजच्या वेळेस मस्जिद समोर नालीचे पाणी; मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!
दि. 2 मे रोजी कळमनुरी शहरातील मुख्य रस्त्यावर अल रजा मजेत असून आणि शुक्रवारच्या नमाजच्या वेळेस मजेत समोर मुख्य नालीचे पाणी रस्त्यावर आल्याने मस्जिद मध्ये नमाज ला जाण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु, याकडे मात्र मुख्याधिकाऱ्यांनी (Chief Officer) लक्ष दिले नाही.