कन्हान (Jayanti Celebration) : रमाई सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय गणेशनगर कन्हान तर्फे आयोजित “त्यागमूर्ती रमाई आणि संत गाडगेबाबा संयुक्त जयंती समारोह” (Jayanti Celebration) आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचे शब्दसुमनांनी स्वागत गीताने, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. तसेच समस्त सामाजिक कार्य-कर्त्यांचे पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या (Jayanti Celebration) अध्यक्षस्थानी प्रा. प्रकाश पोहेकर होते. प्रमुख उपस्थिती निर्मलाताई वाघधरे, डॉ. सुरेश घरडे, डॉ. मुकेश वाघमारे, डॉ. सुमेध रामटेके उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल धोके यांनी केले. स्वागताध्यक्ष एन व्ही बहादुरे होते.
प्रमुख वक्ते अजयकुमार खोब्रागडे, कल्पनाताई मेश्राम यांनी संत गाडगेबाबा व त्यागमूर्ती रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच अध्यक्षीय भाषण प्रकाश पोहेकर यांनीए केले. त्यांनी देखील संत गाडगेबाबा यांचे समाजासाठी केलेले कार्य त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच निर्मलाताई वाघधरे यांनी समाजाने सुशिक्षित व्हावे आणि एकजुटीने कार्य करावे. असा संदेश सांगितला. (Jayanti Celebration) कार्यक्रमाचे विनीत एस जी मंडपे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी गौतमी गजभिये यांनी आभार प्रदर्शन केले, आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.