दोन आरोपी अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त
कन्हान (Illegal sand Transport) : पोलीसांनी रात्र ग्रस्त पेट्रोलिंग दरम्यान बोरडा चौक हाईवे रोडवर अवैध वाळु वाहतुक (Illegal sand Transport) करणारा बारा चाकी ट्रकला पकडुन दोन आरोपींना अटक करुन त्याचा जवळुन ७,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुरुवार (दि.१७) जुलै ला रात्री ११:३० वाजता दरम्यान पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड, पोहवा यशवंत चारदेवे, पोशि आशिष बोरकर सरकारी वाहनाने रवाना होऊन परिसरात पेट्रोलिंग करित असतांना शुक्रवार (दि.१८) जुलै ला पहाटे सकाळी ४ वाज ता दरम्यान नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील बोरडा रोड चौकात ट्रक क्रमांक एम एच ४९ बीझेड १०११ हा जबलपुर वरुन नागपूर कडे जात होता.
पोलीसांनी ट्रक चालकास थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने ट्रक थांबवले. पोलीसांनी ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये वाळु दिसली असता चालकाला वाळुची राॅयल्टी (Illegal sand Transport) बाबत विचारणा केली तर त्याने झिरोची राॅयल्टी आणि ५ ब्रास वाळुची दाखवि ली. पोलीसांनी सखोल चौकशी केली असता १२ चाकी ट्रक मध्ये मागिल डाल्यात अंदाजे ७ ब्रास वाळु मिळुन आली. चालका कडे फक्त ५ ब्रास वाळुची राॅयल्टी मिळुन आली आणि २ ब्रास जास्तीची भरून विनाराॅयल्टी वाहतुक करित असल्याचा पोलीसांना संशय आला.
पोलीसांनी ट्रक चालक छकंवा वाकरे (२५) वर्ष रा. गंगानगर मानकापुर नागपुर २) महेश राजाराम कोसरे (३४) वर्ष रा. संसानगर मानकापुर नागपुर यांना अटक करुन त्याचा जवळुन ट्रक क्रमांक एम एच ४९ बीझेड १०११ किंमत ६५,००,००० रुपये , ७ ब्रास वाळु किंमत ७०,००० आणि अॅनड्राईड मोबाइल १०,००० असा एकुण ७,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ट्रक मालक क्षितीज दिपक गोरले रा. वसंत नगर पार्वती नगर नागपुर व हरीष गोलवंशी रा. काटोल यांचा शोध कन्हान पोलीस घेत आहे. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड हे करित आहे.