Karanja crime :- ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या काजळेश्वर शिवारात वाशिम एल.सी.बी व कारंजा ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून 1 लाख 83 हजार 992 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 7 जणांवर गुन्हा दाखल केला. जप्त केलेल्या मुद्देमालात नगदी रक्कम मोबाईल आणि दुचाक्यांचा समावेश आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई(action) करण्यात आली.
1 लाख 83 हजार 992 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 7 जणांवर गुन्हा दाखल
सोमवारी 14 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी एल सी बी टीम व ग्रामीण पोलीस यांना काजळेश्वर शेत शिवारामध्ये जुगार चालू असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे तात्काळ पथक रवाना करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार काजळेश्वर शेतशिवारात 7 जन बावन तास पत्त्यावर पैशाने हरजितीचा खेळ खेळत असल्याचे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे जवळून नगदी 63,420 रुपये, सहा मोबाईल व पाच दुचाकी असा एकूण 1 लाख 83 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई करिता ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिला.
सदर कारवाई वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, सहाय्यक अप्पर पोलीस अधीक्षक नवोदिका अग्रवाल यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, अमलदार विनोद सुरज खडके, ज्ञानेश्वर म्हात्रे, गोपाल चौधरी तसेच सर्व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आणि ग्रामीण पोलिसांनी केली.




