काटेपूर्णा धरणाच्या 6 दरवाजातून पाणी सोडले!
10 दरवाजातून पाणी सोडण्याची शक्यता!
बार्शीटाकळी (Katepurna Dam) : बार्शीटाकळी तालुक्यातील महांन धरन प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने सद्यस्थितीला धरणात 84.754% अर्थात 85 टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने सोमवार दिनांक 18 ऑगस्टला सकाळी वाजताच्या सुमारापासून धरन प्रकल्पाच्या 6 दरवाजातून 60 सेंटीमीटर उंचीने पाणी सोडण्यात येत आहे. धरणाच्या वरील भागात पाऊस मोठ्या प्रमाणात चालू असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने, तसेच धरणाच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून धरणाच्या सर्वच 10 दरवाजातून अचानक पणे पाणी काटेपूर्णा नदी पात्रात सोडण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती काटेपूर्णा पूर प्रकल्प नियंत्रण कक्षातील उप अभियंता आदित्य कासार व धरण प्रकल्पातील अधिकारी मनोज पाठक यांनी दैनिक देशोन्नतीशी बोलताना दिली आहे.
नदी काठावरील गावातील जनतेला सतर्कतेचा इशारा!
बार्शीटाकळीचे तहसीलदार (Tehsildar) राजेश वजीरे यांनी तात्काळ काटेपूर्णानदी काठावरील प्रत्येक गावातील कोतवाल, पटवारीव व ग्रामसेवक यांना लाऊड स्पीकर, गावात दवंडी देऊन व सोशल मीडियाच्या माध्यमातून नदीपात्रातून ये जा करू नये तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुलावरून पाणी वाहत असताना जीवित हानी होणार नाही, यासंदर्भात काळजी घेण्याचे घ्यावी. अशा प्रकारची माहिती दैनिक देशोन्नतीशी तहसीलदार राजेश वजीर यांनी दिली.
काटेपूर्णा धरणाचे दहा दरवाजातून पाणी सोडले. प्रकल्पात 90=569% जलसाठा!
बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरण प्रकल्पात 18 ऑगस्ट 2025 ला 90. 569% जलसाठा जमा झाला. त्यामुळे या धरणाचे सर्व 10 दरवाजातून 60 सेंटिमीटर उंचीने दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पाणी सोडण्यात आल्याची माहिती काटेपूर्णा प्रकल्पातील पूर नियंत्रण कक्षातील अधिकारी मनोज पाठक यांनी दिली.