हिंगोली (Kayadhu Flood) : जिल्हाभरात २९ आँगस्ट शुक्रवार रोजी मुसळधार पाऊस झाला. या पावसाने कयाधू नदीला मोठा पुर आला होता. पुराचे पाणी हिंगोली तालुक्यातील समगा गावाजवळील पुलावरुन वाहत असल्याने या मार्गावरील दहा ते बारा गावाचा संपर्क तुटला होता. यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय झाली होती.
जिल्हाभरात शुक्रवारी भल्यापहाटे पासून (Kayadhu Flood) मुसळधार पाऊस सुरू झाला तो बारा वाजेपर्यंत कायम होता. या पावसाने कयाधू नदीला मोठा पुर आला होता. कयाधू नदीच्या पुराचे पाणी हिंगोली तालुक्यातील समगा गावाजवळील पुलावरून वाहत असल्याने या मार्गावर असलेल्या दहा ते बारा गावाचा संपर्क तुटला होता. काही जणांनी या नदीवर समगा गावाजवळ असलेल्या रेल्वे पुलावरून मार्ग काढला.
हिंगोली ते समगा जाणारा रस्ता वसई, कंजारा, नांदापुर, सोडेगाव आदी गावांना जोडणारा रस्ता आहे. या गावातील गावकऱ्यांना हिंगोली शहरात येण्यासाठी हा जवळचा व सोयीचा मार्ग आहे. अनेक दुध विक्रेते, शेतकरी, शालेय विद्यार्थी या मार्गाने हिंगोली शहरात येतात. सकाळी सुरू झालेल्या पावसाने कयाधू नदीच्या लाभक्षेत्रात देखील पाऊस झाला कयाधू नदीचे उगमस्थान वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील आगरवाडी येथे आहे. या भागात देखील पाऊस झाल्याने नदीला मोठा पुर आला होता.
ही (Kayadhu Flood) नदी हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, औंढा, कळमनुरी तालुक्यातील अनेक गावातून वाहते शुक्रवारी झालेल्या पावसाने या नदीला आलेल्या पुराचे पाणी समगा तसेच कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथील पुलावरून देखील वाहत असल्याने या मार्गावरील उमरा फाटा ते बोल्डाफाटा मार्गावरील अनेक गावाचा संपर्क तुटला होता. यामुळे समगा व सोडेगाव येथील कमी उंचीचा पुल असल्याने या पुलाची उंची वाढविणे गरजेचे असल्याचे या मार्गावरील गावकरी सांगत आहेत.