खमारी/बुटी (Motorcycle accident) : भंडारा जवळील नविन बायपास महामार्गावरील कोरंभी उड्डाण पुलावर दि.२७ एप्रिल रोजी मध्यरात्री दरम्यान झालेल्या मोटारसायकल अपघातात दोघे मोटारसायकलस्वार तरूण रस्त्यावर पडून जखमी झाले. अमरावती येथील कस्तूब घाटोळे (२५) व सोहम ठाकरे (२६) हे दोघेही मोटारसायकल क्र.एम एच २७ डीएफ ४२७५ या गाडीने लाखनीच्या दिशेने जात असताना कोरंभी वैनगंगा नदीपुलावर दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या (Motorcycle accident) अपघातात दोघेही तरूण रस्त्यावर पडून जखमी झाले.
श्री साई समर्थ कंपनीचे अभियंता संदिप घाटबांधे यांनी (Motorcycle accident) अपघाताची माहिती जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज रूग्णवाहिका चालक यांना देण्यात आली. माहिती मिळताच रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल होत दोघाही जखमींना उपचाराकरीता भंडारा येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी बांधकाम कंपनीचे संदिप घाटबांधे, अमोल नेवारे, रवि दिघोरे यांनी (Motorcycle accident) घटनास्थळी धाव घेत रूग्णांना रूग्णालयात पाठविण्यास मदत केली.