खामगाव-शेगाव रोडवरील घटना, मृतकांमध्ये बोलेरोमधील चौघांचा समावेश!
खामगाव (Khamgaon Accident) : भरधाव बोलेरोने (Bolero) समोरून येणाऱ्या एसटी (ST Bus) बसला धडक देऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या, निंबावर आदळली तर उभ्या बसला (Bus) मागून येणाऱ्या ईदांनी ट्रॅव्हलच्या लक्झरी बसने धडक दिली. या तिहेरी अपघातात बोलेरोतील 4 जण व लक्झरी बसमधील 1 महिला असे 5 जण जागीच ठार झाले. तर लक्झरी व बसमधील 17 प्रवासी जखमी झाले आहे. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने, त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे. ही घटना 2 एप्रिल रोजी पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास खामगाव-शेगाव रोडवरील ब्रम्हाडनायक लॉन्स जवळ घडली.
बसमधील चालक, वाहकासह 13 प्रवासी जखमी!
एसटी महामंडळाच्या परतवाडा एसटी आगराची स्लिपर कोच एम एच 14 एल बी 2384 क्रमांकाची बस 1 एप्रिल रोजी रात्री पुणे येथून परतवाडा जाण्यासाठी निघाली होती. या बसमध्ये एकूण 15 प्रवासी होते. सदर बस खामगाव येथून पहाटे शेगावकडे जात असताना, उपरोक्त ठिकाणी समोरून भरधाव येणारी एम एच 28 ए झेड 3314 क्रमांकाची बोलेरो एसटी बसला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, सदर बोलेरोनंतर, रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडावर आदळली.
बोलेरो चालक व लक्झरीतील चालकासह चौघे जखमी!
यामध्ये बोलेरोचा चेंदामेंदा झाला. तर एसटी बसचेही कॅबीनचे मोठे नुकसान झाले. सदर बस रस्त्याच्च्या कडेला उभी करून चालक व वाहक बोलेरोमधील जखमींना (Injured) बाहेर काढण्यासाठी गेले, त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या एमएच 15 ई एफ 4041 क्रमांकाच्या लक्झरीने सदर बसला मागून धडक दिली. या अपघातात बोलेरोमधील 1) शिवाजी समाधान मुंढे वय 45 रा. ढोरपगाव, ता. खामगाव ह. मु. शेगाव, 2) शिवपाल, 3) ज्ञानेश्वर मडावी, 4) कृष्णकुमार सरोते, तर लक्झरीमधील महेरूनिसा शेख हबीब वंय 45 हे 5 जण जागीच ठार झाले.