पुसद (Khandala Police Station) : खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वसंतवाडी मारवाडी जवळ 25 ऑक्टोंबर च्या पहाटे 9 वाजता दरम्यान बकऱ्या चालणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह लगतच्या विहिरीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. (Khandala Police Station) पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबर च्या सकाळी 9 वाजता दरम्यान लगतच्या परिसरात बकऱ्या चारणारा वृद्ध देवीसिंह भिका राठोड रा. वसंतवाडी मारवाडी जवळ रस्त्याच्या लगत असलेल्या शेतशिवारातील एका विहिरीमध्ये अचानक उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
परिसरातील नागरिकांचे असे म्हणणे होते की हा आत्ताच बकऱ्या चारत होता. या व्यक्तीने अचानक विहिरीमध्ये उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. याप्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास (Khandala Police Station) खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस करीत आहेत.