खरीप हंगाम आढावा सभा
गोंदिया (Gondia) : जिल्ह्यातील शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी (Agriculture Department) कृषि विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारची पिके कसे घेता येतील, यासाठी मार्गदर्शन करुन (Kharif season) खरीप हंगामात नियोजित लक्षांकात वाढ करुन शेतकर्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर (Collector Prajit Nair) यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज (Kharif season) खरीप हंगाम पुर्व आढावा सभा घेण्यात आली, त्यावेळी ते (Collector Prajit Nair) बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा अग्रणी प्रबंधक नरेंद्र मडावी, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अविनाश लाड, जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार, आत्माचे प्रकल्प संचालक अजित आडसुळे, कृषि विकास अधिकारी महेंद्र मडामे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सन २०२३-२४ या वर्षात (Kharif season) खरीप हंगामात केलेल्या कामाची माहिती देऊन खरीप हंगाम सन २०२४-२५ या वर्षाचे नियोजन सादर केले. सन २०२३-२४ या वर्षात सरासरी १३१०.१८ मि.मी. पाऊस झाला. याच वर्षात ४ लाख ८९ हजार ५४३ मेट्रीक टन उत्पादन झाले होते. यात भात पिकाचे उत्पादन ४ लाख ७१ हजार १४७ मेट्रीक टन आहे तर उर्वरित पिकांमध्ये तुर, तीळ व भाजीपाल्याचा समावेश आहे. सन २०२४-२५ साठी ५ लाख ५९ हजार ९२५ मेट्रीक टन उत्पादनाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यात (Rice peak production) भात पीक उत्पादनासाठी ५ लाख २१ हजार ६४० मेट्रीक टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. उर्वरित पिकांमध्ये तुर, तीळ व भाजीपाला पिकाचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे दिली. सभेला विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
पीक विमाची रक्कम देण्याचे निर्देश
शेतकर्यांच्या कृषिपंपांना तातडीने वीज जोडून देण्यात यावी. राष्ट्रीयकृत सहकारी बँकांनी शेतकरी सभासदांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. जिल्ह्यात कुठेही खताची लिंकींग होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात यावी. प्रधानमंत्री पीक विमा (PM Crop Insurance) योजनेंतर्गत शेतकर्यांना देय असलेली प्रलंबीत रक्कम सोमवार २९ एप्रिल पर्यंत देण्याचे निर्देश युनिव्हर्सल सोम्पो या (PM Crop Insurance) पीक विमा कंपनीला दिले.