रिसोड (Washim):- सद्यस्थितीत महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे (torture) प्रकरण दिवसेंदिवस वाढतच आहेत. नुकतेच पुणे येथील स्वारगेट येथे शिवशाही बस मध्ये झालेल्या बलात्काराच्या (rape) प्रकरणाची शाई वाळत नाही तेच रिसोड मध्ये एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची घटना दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे भर दिवसा ज्या क्लास समोर घटनेला सुरवात झाली, त्या समोरच परीक्षाकेंद्रवर पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांची वचक नसल्याचे दिसत आहे.
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची घटना
सदर प्रकरणी पीडिता आपल्या परिवारासह रिसोड पोलीस स्टेशन मध्ये संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान पोहचली. याबाबत पीडिता ने रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती कम्प्युटर क्लासेस मधून दुपारी सव्वादोन च्या दरम्यान घरी जाण्यासाठी रस्त्यावर आली असता तिच्याजवळ एक अनोळखी व्यक्ती आला व त्याने सांगितले की मी तुझ्या वडिलांचा मावस भाऊ आहे तुझे मामा मला ओळखतात तू माझ्या घरी चल माझी मुलगी तुला भेटण्यासाठी इच्छुक आहे. असे सांगून तिला एका ऑटो मध्ये बसवून सवडच्या दिशेने घेऊन गेला. सवडच्या मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर अत्यंत निर्जनस्थळी त्याने पिडीतेला नेऊन त्या ठिकाणी तिला चाकूचा धाक दाखवला व “तू मला तुझ्या सोबत शारीरिक संबंध करू दे अन्यथा मी तुझा गळा चिरून तुला विहिरीत टाकून देईन” अशी धमकी देत तिच्यासोबत अतिप्रसंग केला.
27 फेब्रुवारीला रात्री रिसोड पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली
याप्रकरणी रिसोड पोलिसांनी कलम 64, 351 (2) बी एन एस सहकलम 4, 6 पोक्सो नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेचे गांभीर्य बघता पोलीस उपविभागीय अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी 27 फेब्रुवारीला रात्री रिसोड पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नागरे करीत आहेत. सदर प्रकरणी रिसोड पोलीस चे अधिकारी व कर्मचारी हे घटनेच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना बहुतांश सीसीटीव्ही (CCTV) बंद असल्या आढळले. सदर घटना भर दिवसा होऊनही यातील आरोपी अद्यापही फरार असल्याने आर्मी पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.