युवक गेले दारूच्या आहारी
बनावट दारूमुळे मृत्यु चा आकडा वाढला
कोरेगाव, चोप (Koregaon liquor deluge) : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव व चोप येथे अवैध दारू विक्री केल्या जात आहे त्यामुळे सामाजीक व्यवस्था बिघडलेली आहे. कोरेगाव व चोप (Koregaon liquor deluge) हे तालूक्यातील महत्वपूर्ण ठिकाण आहे. कोरेगाव येथे दर शुक्रवारी आवडी बाजार भरल्या जाते या बाजारात चोप, परीसरातील मुले, महिला वर्ग व नागरीक बाजारात येत असतात.
आणि बाजारात व इतर दिवशी खल्या पध्दतीने दारु विक्री केल्या जाते त्या मुळे सर्वसाधारण नागरीकानां त्रास सहन करावे लागत आहे तर दारू पिणाऱ्यां कडून अवाच्य भाषेत बोलले जात असल्याने इतर नागरिकांना नाहाक त्रास सहन करावा लागतो तर. (Koregaon liquor deluge) युवक वर्ग दारूच्या आहारी गेल्याने अनेक घरे उधवस्थ झाले आहेत. या दोन वर्षात 50 च्या वर बनावट दारू मुळे कोरेगाव व चोप येथिल युवकांचा मुत्यू झाला. गडचिरोली जिल्यात 1993 मध्ये दारुबंदी साठी 1हजार 2 गावांनी सर्मथन दिले होते व या जिल्हा दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. परंतू हा निर्णय प्रशासनाच्या निष्क्रीय मुळे कागदावरच राहीला आहे.
अनेक सेवा सहाकरी संस्था कडून पुढाकार घेऊन दारू विक्रीला वचप बसवण्याचा पूढाकार केला तरी पण खुलेआम आम पद्धतीत अवैद्य दारु विक्री केल्या जाते कोरेगाव व चोप येथे एकुन 30 च्या वर अवैध दारू (Koregaon liquor deluge) विक्रेते असुन प्रशासन गफलतीत आहे. त्यामुळे परीसरातील सामाजीक व कौटेंबीक व्यवस्था बिघडले आहे तर युवकांचा बनावट दारू मुळे मृत्यूचा आकडा शंभरी गाठतोकी की काय या विवंचनेत सामान्य नागरीक पडलेले आहेत तरी पोलीस प्रशासनाने व इतर संस्थांनी या परीसरातील दारूबंदी वर कडक अमल करण्याची मागणी केलेली आहे.