मारेगाव (Yawatmal) :- हवामान खात्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी महाराष्ट्र विदर्भातसह आठ दिवसा अगोदर मान्सूनचे (Monsoon) आगमन होणार असल्याचे सांगितल्याने तालुक्यातील शेतकर्यांनी उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून उसनवारी व कर्ज काढून बी- बियाण्याची कपाशीची धुरळ पेरणी केली. त्यानंतर तालुक्यात बर्याच भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी (Farmer) चिंतातुर झाला आहे. त्यामुळे पावसाअभावी कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच करपण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आधी परिसरातील बहुतांश भागात पाऊस झाल्यानंतर अचानक पावसाने हुलकावणी दिली
अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकरी नेहमीच भरडला जातो निसर्ग शेतकर्यांना साथ देत नाही शासन शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे राहायला तयार नाही शेतकरी हतबल झालाय. मात्र शेतकर्यांनी मोठ्या उमेदीने संकटाचा सामना करीत उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून बी-बियाण्यासाठी उसनवारी व कर्ज काढून खरीप हंगामातील पिकाची लागवड केली. शेतकर्यांनी केलेल्या धुरळ पेरणीवर आलेल्या अचानक पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांच्या काळजाची धडधड वाढत चालली आहे. कपाशी जमिनीतून बाहेर उमलण्यासाठी पावसाची आवश्यकता असते अनेकदा आकाशात काळे ढग दाटून येतात. मात्र पाऊस यायला तयार नाही पुन्हा एक दोन दिवसात पाऊस आला नाही तर उसनवारी व कर्ज (Loan) काढून पेरलेले महागडे बियाणे पुन्हा घ्यायला शेतकर्यांकडे पैसा उरणार नाही. तालुक्यात मारेगाव, मार्डी, कुंभा, बोटोनी, वेगाव आधी परिसरातील बहुतांश भागात पाऊस झाल्यानंतर अचानक पावसाने हुलकावणी दिली. सध्या कपाशीचे बीज कोंब घेऊन जमिनी बाहेर येण्याचा काळ असतानाच पाऊस गायब झाला आहे.
पावसा अभावी कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच करपण्याचा धोका निर्माण झाला
कपाशी वाचवण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे मात्र पाऊस येण्याची कोणतीच चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे आता पाऊस आला नाही तर शेतकर्यांचे काही खरे नाही असा केवीलवाना सूर शेतकरी वर्गात उमटू लागला आहे. त्यामुळे पावसा अभावी कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच करपण्याचा धोका निर्माण झाला असून आता तरी काळ्या आईच्या कुशीत पेरलेले बीज उमलू दे एवढीच मापक इच्छा शेतकरी केविलवाणी नजरेने आभाळाकडे पाहून व्यक्त करीत आहे.हवामान खात्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी आठ दिवस अगोदर पाऊस येणार असल्याचे सांगितल्याप्रमाणे पाऊस येईलच या अपेक्षेने बर्याच शेतकर्यांनी कपाशीची धुरळ पेरणी केली मात्र पेरणी केल्यानंतर आलेल्या अचानक पावसाने शेतकर्यांची धडधड वाढविली असून दोन दिवसात पाऊस आला नाही तर तालुक्यातील बर्याच्या शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.