प्रगतीशील शेतकरी पाटील बंधूंच्या बागेतून पहिला तोडा रवाना!
निटूर (Latur Banana) : निलंगा तालुक्यातील वळसांगवी (Valsaangavi) येथील प्रगतीशील शेतकरी गोविंदराव पाटील आणि गोपाळराव पाटील यांच्या शेतातील केळी इराण आणि इजिप्त या देशात निर्यात होत असून, आज या बागेतून पहिला तोडा रवाना झाला. निलंगा तालुक्यातील पहिल्यांदाच वळसांगवी येथील केळी परदेशात विक्रीसाठी जात असल्यामुळे गावासाठी भूषण ठरले आहे. नेहमीच वेगवेगळे प्रयोग शेतीत राबविण्यासाठी गोविंदराव आणि गोपाळराव हे दोघे बंधू प्रयत्नशील असतात. यावर्षी त्यांनी केळीची लागवड तीन एकरात करून ती थेट परदेशात (Abroad) पाठवण्यासारखी पिकवली आहे. केळीला (Banana) सध्या येथे 10 रु. प्रति किलो भाव असून एक्सपोर्ट साठी 17 रुपये भाव मिळाला आहे. तीन एकरातील केळी अंदाजे उत्पन्न 18 लाखाचे होईल. खर्च वजा जाता 10 लाखाचा निव्वळ नफा होईल, असे प्रगतशील शेतकरी गोविंदराव पाटलांनी सांगितले.
यावेळी निलंग्याचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके (Sub-Divisional Officer Sharad Zhadke), उपविभागीय कृषी अधिकारी (Sub-Divisional Agriculture Officer) जाधव, सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी भिसे, तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदे, मंडळ कृषी अधिकारी पाटील, कृषी पर्यवेक्षक घाडगे, कृषी सहाय्यक आराध्ये, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Agricultural Produce Market Committee) संचालक अरविंद पाटील जाजनूरकर, शिरोळचे उपसरपंच प्रताप पाटील, हेळंबचे सरपंच सिरसे, माटेगडीतील शेतकरी, परिसरातील कृषी सेवा केंद्राचे संचालक, भरत सोमवंशी, गणपत बिरादार, धनाजी बोकडे, विकास बिरादार, मारुती बिरादार, विश्वंभर बिरादार, तात्याराव बिरादार, पांडुरंग बिरादार, पंडित बिरादार, संदीप अण्णाराव पाटील, केशव बिरादार, भानुदास बिरादार, श्रीधर बिरादार, बाबुराव तेलंगे आदी उपस्थित होते.
शेतीतील प्रयोगासाठी आदर्श गाव!
शेतकऱ्यांनी उसाच्या शेतीला पर्याय म्हणून केळी लागवड, नारळाची लागवड करून उसापेक्षा उत्पन्नात झटपट वाढ होईल आणि शेतकऱ्यांचा भरपूर फायदा होईल. केळी आणि नारळाची शेती केल्यानंतर, अवघ्या दहा महिन्यातच ऊत्पन्न आपल्याला मिळू शकतं आणि उसापेक्षा ही पिके आपल्याला जास्त फायदा देऊन जातात. वळसांगवी गाव हे भविष्यात शेतीतील प्रयोगासाठी आदर्श गाव (Ideal Village) ठरेल, असे उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी सांगितले.