लातूर (Latur) :- अखिल भारत पद्मशाली संघम हैद्राबाद संलग्न मराठवाडा पद्मशाली महासभेच्या व्यापक बैठकीत लातूर जिल्ह्यातील सर्व प्रौढ महिला व युवक तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली. लातूर जिल्हाध्यक्षपदी श्रीनिवास नक्का तर युवक जिल्हाध्यक्षपदी शिवचंद्र मलफेदवार आणि महिला जिल्हाध्यक्षपदी सौ. निर्मलाताई तम्मलवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
युवक जिल्हाध्यक्षपदी शिवचंद्र मलफेदवार तर महिला जिल्हाध्यक्षपदी निर्मलाताई तमलवाड
रविवारी शिरूर ताजबंद येथील महादेव मंदिर मंगल कार्यालयात नरसिंग मंतलवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तथा समाजभूषण गोविंदसेठ कोकुलवार, नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संग्राम निलपत्रेवार, मराठवाडा युवक संघटनेचे कोषाध्यक्ष भारत गठेवार, ज्येष्ठ मार्गदर्शक बाबुराव उडतेवार, शिवाजी पिचकेवार हे होते. लातूर तालुकाध्यक्षपदी व्यंकटराव सुंकरवार, युवक अध्यक्षपदी राम गुडेवार, महिला अध्यक्षपदी सौं.ज्योतीताई अडबलवार यांची बिनविरोध निवड (Choice) करण्यात आली.
महिला अध्यक्षपदी सौं. लक्ष्मीबाई इरबतनवाड यांची बिनविरोध निवड
शिरूर अनंतपाळ तालुका प्रौढ अध्यक्षपदी बाबुराव उडतेवार, युवक अध्यक्षपदी व्यंकट पिचकेवार, महिला अध्यक्षपदी सौं.लक्ष्मीबाई इरबतनवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अहमदपूर तालुकाध्यक्षपदी नरसिंग चिलकावार, युवक अध्यक्षपदी प्रदीप रब्बेवार, महिला अध्यक्षपदी सौं.विमलबाई तम्मलवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चाकूर तालुकाध्यक्षपदी नागनाथ साळी, युवक अध्यक्षपदी मारुती साळी, महिला अध्यक्षपदी सौ. राजश्री साळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.