-अफजल मोमीन
लातूर (Latur Heat Wave) : यंदा लवकरच थंडी सरून उन्हाचा कडाका वाढला त्यामुळे उकाडा जाणवत आहे. लातूरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. परिणामी (Latur Heat Wave) अंगाची लाहीलाही होऊ लागलीय दिवसभर कडाक्याचं ऊन असल्यामुळं लातूरकरांना बस मध्ये किंवा अन्य खासगी वाहनातून
प्रवास करताना कमालीचा उकाडा जाणवत आहे. त्यामुळं शरीरातून घामाच्या धारा वाहतात. या (Latur Heat Wave) उकाड्यातून सावरण्यासाठी आणि कोरडा झालेल्या घशाला थंडावा मिळण्यासाठी लातूकर अनेक थंड पेयांना पसंती देत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. रसवंतीगृहाचे गाडे कडेला लागलेली पाहून अपोआपच नजर थंड रसाकडे वळते तर अनेक ठिकाणी थंडगार कोल्ड्रिंक्स, थंडपेय, शरबतची गाडे…. नजरेतून सुटत नाहीत.
‘या’ पेयामुळं थंड वाटतं….. की पुन्हा आपल्या कामात व्यस्त असतात
लातूरात गेल्या आठवड्यापासून वातावरणातील (Latur Heat Wave) तापम ान कमालीचं वाढलंय. त्यामुळं सर्वत्र माणसाबरोबर पशु पक्षांनाही गरमीचा त्रास जाणवत आहे. या गरमीपासून मुक्तता मिळविण्यासाठी आणि उकड्यापासून दिलासा मिळण्यासाठी (Latur Heat Wave) लातूर येथील दयानंद गेट परिसरातील अटोवरील रसवंतीगृह, तसेच याच ठिकाणीअसलेलं जिरा सोडा, लेमन, कोल्ड्रिंक्स चे गाडे थाटली आहेत. ते विद्यार्थ्यांना व रस्त्यावरून जाणाऱ्यांना थंडावा देत आहेत.
दयानंद गेट परिसरातील अँटो रसवंतीगाडी चे चालक किशोर जाधव म्हणाले की, सध्या (Latur Heat Wave) उन्हाळा कडक जाणवत असल्याने सकाळी सहा वाजल्यापासूनच ऊसाच्या रसाची विक्री होत असून, नॅचरल व शरीरासाठी ऊसाचा रस पोषक असल्याने मागणी वाढली असून दहा रूपये ग्लास, विकतो दररोज दोनशे ग्लास विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ऊसाच्या तुलनेत बच्चे कंपनी व कॉलेजच्या विद्यार्थ्यांची लेमन सोडा , जिरा सोडा, स्ट्रिंग पेय, आदी कोल्ड्रिंक्सला मागणी वाढली असून, आणखीन मागणी वाढतच जाणार, असे दयानंद गेट परिसरात दहा रुपये बॉटल प्रमाणे दररोज ५०० बॉटल विक्री करत असल्याचे कोल्ड्रिंक्स गाडी चालक रूपेश जयस्वाल यांनी सांगितले.