विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सवाल
हिंगोली (Ambadas Danve) : अतिवृष्टीने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे पिकासह शेतजमीन खरडून गेल्या आहेत. नुकसानी संदर्भात केंद्र सरकारने राज्याला नुकसानीचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले मात्र अद्यापही राज्य सरकारने अतिवृष्टीचा प्रस्ताव पाठविला नाही तो प्रस्ताव सरकार केंद्राला कधी पाठविणार व मदत कधी मिळणार असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारा सोबत ६ सप्टेंबर सोमवार रोजी बोलताना केला आहे.
यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, विनायक भिसे, जिल्हा प्रमुख गोपू पाटील सावंत, संदेश देशमुख, माजी आ. डॉ. संतोष टारफे, राजेश पाटील गोरेगावकर, उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे, डॉ. रेणुका पतंगे, गणेश शिंदे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष उध्दवराव गायकवाड, सुनिल काळे, चंद्रशेखर उबाळे, विठ्ठल चौतमल आदीची उपस्थित होती. यावेळी पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी त्यांना मदतीचा प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले. परंतु अद्यापही प्रस्ताव पाठविलेला नाही. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असताना अद्यापही शासनाकडून मदत जाहीर झाली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यांना मदतीचा प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले. परंतु अद्यापही प्रस्ताव गेला नसल्याने राज्य शासनाची नियत खराब असल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्राने अडीच हजार रुपये कोटीची मदत जाहीर केली. ती मदत गेली कुठे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हे शासन उद्योगपतींचे हित जोपासत आहे. राज्यात शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. त्यावर करोडो रुपये खर्ची घातले जात आहे. परंतु शेतकर्यांनी एक इंचही जमिन शक्तिपिठासाठी मोजू देऊ नये, असे आवाहन देखील दानवे यांनी केले.
शेतकर्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चा काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापूर्वी ८ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.




 
			 
		

