गडचिरोली (Gadchiroli):- तालूक्यातील पलसगड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या जोशीटोला गावात मध्यरात्रि बिबट्याने(Leopard) शिरकाव करीत गावातील कोंबड्या व पाळीव जनावरांचा शिकारीकरीता त्यांचा पाठलाग सूरू केला. मात्र, या प्रयत्नात त्याचा तोल जात तो खाजगी विहीरीत पडला ही घटना काल रात्री बारा एक च्या दरम्यान घडली असुन आज दि १६ जूलै मंगळवार रोजी पहाटे पासून वनविभागाचा(Forest Department) वतीने विहीरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्याकरीता रेस्क्यू ऑपरेशन(Rescue operation) राबविण्यात येत होता. मात्र विहीरीची तोंडी लहान असल्याने त्यात अडचण निर्माण झाली होती अखेर दूपारी १२ वाजता अथक प्रयत्नानंतर वडसा वनविभागाचा रेस्कू चमूला बिबट्याला सूरक्षित पणे बाहेर काढण्यात यश आले.
कोंबड्या व पाळीव जनावरांचा शिकारी पडला विहिरीत
जोशीटोला गावात मध्यरात्रि २ वाजेदरम्यान वयस्क बिबटने प्रवेश करीत गावातील गोठ्यात असलेल्या पाळीव जनावरे शेळ्या, गाय बैल तसेच कोंबळ्यावर हल्ला चढविला यावेळी जनावरे सैरावैरा पळू लागले. तर बिबट त्यांचा पाठलाग करू लागला या प्रयत्नात अंधारामूळे अंदाज न आल्याने तो गावातील रघूनाथ बंसोड यांचा खाजगी विहीरीत पडला. यावेळी गावातील काही गायी बिबट्याचा पंजाचा माराने जखमी सूद्धा झाल्या आहेत. सदर घटनेची माहिती दिलीप बंसोड यानी वन कर्मचारी (Forest staff) मधूकर दरवडे याना देताच त्यानी घटणास्थळ गाठत वरिष्ठ अधिकार्याना याची माहिती दिली. पहाटे लगेच वन अधिकारी व कर्मचार्यांची रेस्क्यू चमू घटणास्थळावर दाखल झाली. मात्र विहीरीची तोंडी अगदी ४ फूट व्यासाची अरूंद असल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबविणे कठीन ठरत होते बिबट विहीरीत असलेल्या मोटार पंपाचा पाईपला पकडत तरंगत होता अखेर दूपारी १२ वाजेचा सूमारास वडसा वनविभागाचा रेस्कू चमूला विहीरीत लहान आकाराचा पिंजरा सोडत बिबट्याला सूरक्षित पणे बाहेर काढण्यात यश आले आहे. बिबट्याची पशूवैद्यकीय अधिकारी कडून आरोग्य तपासणी करीत त्याला त्याचा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
सदर रेस्क्यू ऑपरेशन वडसा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी(Forest Range Officer) वन्यजीव एम जी मेश्राम यांचा मार्गदर्शनात कूरखेडाचे क्षेत्र साहायक एम एम सालोरकर पलसगडचे क्षेत्र साहायक एस एल शेंडे गेवर्धा क्षेत्र साहायक आर एन राऊत गोठणगांव क्षेत्र साहायक डी डी उईके वनपाल पी एन मेश्राम वनरक्षक के के काशीवार,गोन्नाडे,दुधबळे,कूमरे तसेच वडसा वनविभागाचा वन्यजीव संरक्षण चमू द्वारे करण्यात आले.




