कोकणागड फाट्याजवळील घटना
धारगाव/खमारी/बुटी (Leopard Death) : भंडारा तालुक्यातील मालीपार बिट अंतर्गत येत असलेल्या धारगाव जवळील कोकणागड फाट्याजवळ महामार्गावर दि.२८ मे रोजी रात्री ८.३० वाजतादरम्यान एका अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. त्यात (Leopard Death) बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. दरवर्षी रस्ता अपघातामध्ये अनेक वन्यप्राण्यांचा बळी जात असल्याने ही वन्यप्रेमींसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
धारगाव जवळील कोकणागड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने महामार्ग ओलांडणार्या बिबट्याला धडक दिली. त्यात (Leopard Death) बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. तर अज्ञात वाहन घटनास्थळावरुन पसार झाली. याची माहिती वनविभाग तसेच कारधा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच कारधा ठाण्यातील पोउपनि नवलकिशारे इंगळे व पोशि प्रदीप भुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली तर वनविभागाचे वन अधिकारी रितेश भोंगाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे, वनकर्मचारी ए. डी. वासनिक, बीरक्षक मालीपार डोंगरे, क्षेत्र सहाय्यक तिबुडे, बीटरक्षक मांडवी ए. एम. उपाध्ये तसेच आरआरटी पथक घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. (Leopard Death) मृत बिबट्याला ताब्यात घेऊन गडेगाव डेपो येथे नेण्यात आले. दि.२९ मे रोजी पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून शवविच्छेदन करुन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक राहुल गवई यांचे मार्गदर्शनात वनाधिकारी व कर्मचारी करीत आहेत.