भंडारा (Lightning strike) : जिल्ह्यात विजेचे तांडव सुरु आहे. दि.२० मे रोजी सायंकाळी साकोली व लाखांदूर तालुक्यात विजेचे तांडव घातले. वादळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यामुळे तालुक्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. साकोली तालुक्यतातील उसगाव शिवारात वीज कोसळल्याने एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला. तर लाखांदूर तालुक्यातील कोच्छी शिवारात (Lightning strike) वीज कोसळल्याने एक म्हैस व एक वघारीचा मृत्यू झाला. दोन ठिकाणी कोसळलेल्या विजेच्या तांडवाने तीन पाळीव जनावरांचा मृत्यू झाला.
हवामान विभागाने जिल्ह्यात (Lightning strike) विजेच्या कडकडाटसह वादळी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविला होता. दि.२० मे रोजी साकोली व लाखांदूर तालुक्यातील काही भागात अचानक दुपारी मेघगर्जनेसह वादळी पावसाने झोडपून काढले. तर उसगाव शिवारात चरण्यास गेलेल्या अमरनाथ लक्ष्मण बिसेन या शेतकर्याच्या म्हशीवर वीज कोसळल्याने मृत्यू झाला.
तर लाखांदूर तालुक्यातील कोच्छी शिवारात रामू चिंतामण देसाई या शेतकर्यांच्या एक म्हैस व एक वघारीवर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. यात सदर पशुपालकाचे जवळपास ८० हजारांचे नुकसान झाले. (Lightning strike) विजेचे तांडव कायम असल्याने शेतकरी पशुपालकांसह नागरिकांत धडकी भरली आहे. आज झालेल्या अवकाळी मुसळधार वादळी पावसाने काही भागात प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.