मानोरा (Washim) :- शेतकरी नेते, दैनिक देशोन्नतीचे (Deshonnati) संपादक लोकनायक प्रकाश पोहरे (Prakash Pohre) यांनी दि. ३ एप्रिल रोजी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा विरासत नंगारा म्युझियमला अचानक भेट देऊन पाहणी केली. व आगामी पिढीला हे म्युझियम (museum)बंजारा समाजाला मार्गदर्शक ठरेल असे मत व्यक्त केले.
पाहणी करून संग्रहालय वास्तूची केली प्रशंसा
यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ पत्रकार शंकर आडे, अंदुरा ऍग्रो प्रापसेन कंपनीचे संचालक प्रशांत वराडे, पोहरादेवी अर्बन क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष पवन चव्हाण यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. यावेळी लोकनायक प्रकाश भाऊ पोहरे यांनी सांगितले की, बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवीत बंजारा विरासत म्युझियम स्थापन झाल्याने हे ठिकाण आदर्श ठरले असुन बंजारा समाजाला संपूर्ण कल्पना देणारे हे म्युझियम आहे. बंजारा समाज अथवा देशातील लोकांसाठी हे म्युझियम मार्गदर्शक ठरणार आहे. म्युझियमची कल्पकता, क्वालिटी अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे. जुनी विरासत रूढी परंपरा मांडणीचे कौतुक केले.
