Gadchiroli :- ८ जुलै पासून जिल्ह्यात निर्माण झालेली पुरपरिस्थिती तिसर्या दिवशी आज १० जुलै रोजीही कायम होती. जिल्ह्यास पुराचा विळखा कायम असल्याने जिवनावश्यक वस्तुंची ने-आण करणारी वाहने गेल्या तिन दिवसापासून पूर ओसरण्याच्या प्रतिक्षेत पुलांच्या (Bridge) दोन्ही बाजुला उभे आहेत. यामुळे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.
गडचिरोली आगाराचे ३५ शेड्युल रद्द
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली – आरमोरी , कुरखेडा – कोरची, गडचिरोली – चामोर्शी हे महत्वाचे मार्ग बंद असल्याने राज्य परीवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारातून जाणारे ३५ शेड्युल रद्द करण्या आले आहेत. यामुळे गडचिरोली आगाराचे जवळपास ३ ते ४ लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती रापमच्या गडचिरोली आगारातील अधिकार्यांनी दिली आहे.
पुरामुळे बंद असलेले मार्ग
१) गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (पाल नदी, कोलांडी नाला, गाढवी नदी)
२) गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (गोविदपुर नाला, शिवणी नाला)
३) आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग ३५३सी (दिना नदी)
४) तळोधी आमगाव रेगडी देवदा रस्ता राज्यमार्ग३८१(पोहार नदी)
५) अहेरी वटरा बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला) तालुका अहेरी
६) हरनघाट चामोर्शी रस्ता राज्यमार्ग ३७० (दोडकुली, दहेगाव नाला)
७) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा ५३ तालुका चामोर्शी
८) अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा ४७ तालुका देसाईगंज
९) भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा १७ (हळदीमाल नाला, अनखोडा नाला) तालुका चामोर्शी
१०) वडसा वळण मार्ग प्रजिमा ४१ तालुका देसाईगंज
११) चामोर्शी मार्कंडादेव रस्ता प्रजिमा ३७ तालुका चामोर्शी
१२) खरपुंडी दिभना बोदली रस्ता प्रजिमा ४४ तालुका गडचिरोली
१३) आरमोरी अरसोडा रस्ता प्रजिमा- ४७ तालुका आरमोरी
१४) वेलतूर ते एकोडी रस्ता प्रजिमा,- ५५ तालुका चामोर्शी
१५) वाघाळा सायगाव शिवणी रस्ता प्रजिमा ३४ तालुका आरमोरी




