बुलडाणा (Maa Jijau Urban bank) : मुंबई येथील महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड तर्फे दिला जाणारा मानाचा “दीपस्तंभ 2024 पुरस्कार” (Dipstambha Award) हा हैद्राबाद रामोजी फिल्मसिटी येथे 3 ऑगस्ट रोजी बुलढाणा येथील मॉ जिजाऊ अर्बन पतसंस्थेला (Maa Jijau Urban ban)k महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, कॉसमॉस को-ऑप बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे व गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार संस्थेच्या वतीने मॉं जिजाऊ अर्बन पतसंस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी तायडे, सचिव नितीन जाधव, कार्यकारी संचालक रामेश्वर साखरे व व्यवस्थापक मनोज तायडे यांनी स्विकारला.
संस्थेचे सर्व भागधारक, खातेदार, ठेवीदार यांचे अनमोल सहकार्य व संस्थेचे सर्व संचालक तथा कर्मचारी वृंद अल्पबचत ठेव प्रतिनिधी यांचे परिश्रमाने सलग दुसर्यांदा मॉं जिजाऊ अर्बन च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ समीर पर्हाड यांनी आनंद व्यक्त केला असून ग्राहकांचा विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवित मॉं जिजाऊ अर्बन (Maa Jijau Urban bank) आपली वाटचाल आणखी वेगाने करेल तसेच शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी मौजे तांदुळवाडी व नांद्राकोळी येथे धान्य गोदामचे बांध काम प्रगती पथावर आहे. संस्थेने मार्च 2024 अखेर एकूण व्यवसाय 230 कोटीचा पूर्ण केला असून संस्थेची कामगिरी अमरावती विभागातून प्रथम क्रमांकाची राहिली.