मानोरा (Mahant Jitendra Maharaj) : तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील धर्मपीठ भक्तीधामचे धर्मगुरु जितेंद्र ब्रम्हदत्त महाराज (Mahant Jitendra Maharaj) यांची शासनाने संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृध्दी योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव व प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अशासकीय सदस्य पदी तीन वर्षांकरिता निवड केली आहे.
संत सेवालाल महाराज बंजारा – लमाण तांडा समृध्दी योजनेअंतर्गत तांडयासाठी स्वतंत्र ग्राम पंचायत स्थापन करणे, तांड्याला महसूली गाव घोषित करणे व इतर अनुषंगिक कामे या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सदर योजनेअंतर्गत करावयाच्या कामाचा ग्राम पंचायतीकडून प्राप्त झालेल्या प्राधान्यक्रम व निकड लक्षात घेऊन कामाची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या निवडीचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र शासनाचे उपसचिव पंडीत जाधव यांनी पाठविले आहे. आपल्या निवडीचे श्रेय धर्मगुरु जितेंद्र महाराज (Mahant Jitendra Maharaj) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, भगवंत सेवक तथा धर्मपीठ भक्तीधाम निर्माता किसनराव राठोड यांना दिले आहे.