उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
हिंगोली (Khakibaba Math Sansthan) : येथील संत खाकीबाबा मठ संस्थानच्या महंत पदाचा निर्णय लागेपर्यंत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय सहधर्मदाय आयुक्तांनी काही दिवसापुर्वी हा निर्णय दिला होता.त्यावर अपिल दाखल करण्यात आली असता उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने खाकीबाबा मठ संस्थानचा कार्यभार महंत कमलदास महाराजांकडे कायम ठेवण्याचा निर्णय दिला.
हिंगोलीतील खाकीबाबा मठ संस्थानच्या (Khakibaba Math Sansthan) महंत पदी गुरू शिष्य परंपरेने नियुक्त झालेल्या महंत कमलदास महाराज यांच्या नियुक्तीला नांदेड येथील सत्तु महाराज यांनी आव्हान दिले आहे. दरम्यान नव्याने नियुक्त झालेल्या कमलदास महाराज यांनी धर्मदाय कार्यालयाकडे बदली अहवाल दाखल केला होता. सत्तु महाराज यांनी देखील एक स्वतंत्र बदली अहवाल दाखल केला होता. नांदेड येथील विभागीय सहधर्मदाय आयुक्त कार्यालयाने हे दोन्ही बदली अहवाल अमान्य केले असुन तुर्त हिंगोलीतील सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयातील सिमा मुसळे यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती केली आहे.
नवनियुक्त प्रशासकाने कामकाज कसे करावे याबाबत संबंधित न्यायालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्यात आली असता त्यावर सुनावणी होवून (Khakibaba Math Sansthan) खाकीबाबा मठ संस्थानचा कार्यभार महंत कमलदास महाराजांकडे कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे.