रिसोड (Risod) :- गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजने अंतर्गत महसुली क्षेत्रिय कार्यालयाकडून जनतेस सोई सुविधा उपलब्ध करून देणे. याकरीता प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर (camp) आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसिलदार प्रतीक्षा तेजनकर यांचे मार्गदर्शनात बुधवार २३ एप्रिल रोजी रिसोड महसूल मंडळ स्तरावर समाधान शिबिर आयोजित करण्यात आले.
महाराजस्व अभियान शिबीर
याशिबिरामध्ये नागरिकांना जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, निराधार योजनेचे अर्ज, सातबारा फेरफार उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत असलेली जलतारा योजनेची माहिती सर्व नागरिकांना देण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी नायब तहसिलदार कुळमेथे तरप्रमुख अतिथी म्हणुन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतिश मांदळे, पत्रकार शीतलकुमार धांडे,माजी सभापती बाळासाहेब खरात,संजय सदार, सरपंच वर्षा पावनमारे होत्या. यावेळी उपस्थीत नागरिकांना मंडळअधिकारी यू.एस.नप्ते, एस.एम.पढवे तलाठी धनंजय काष्टे,हनुमंते, नेमाडे, सुर्वे यांचासह ग्राम महसूल अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन तलाठी धनंजय काष्टे यांनी केले. तर आभार हनुमंते यांनी मानले.