धाराशिव (Ganesha Idol Heritage) : प्राचीन काळी ‘तगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेर नगरीच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष आजही येथील पुरातन अवशेष, मंदिरे आणि शिल्पांमधून मिळते. याच तेरमध्ये विविध कालखंडातील 21 पुरातन गणेशमूर्ती आजही जतन करण्यात आल्या असून, (Ganesha Idol Heritage) गणेशाचे अंकन असलेली काही प्राचीन नाणीही येथे आढळली आहेत. त्यामुळे धार्मिक श्रद्धेबरोबरच तेरचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले आहे.
तेरच्या उत्खननात विविध प्रकारच्या दगडांमध्ये कोरलेल्या गणेशमूर्ती सापडल्या. त्यातील अनेक मूर्ती रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. आकाराने लहान असलेल्या या (Ganesha Idol Heritage) मूर्तींवरील बारकाईची कलाकुसर तत्कालीन शिल्पकारांची कल्पकता, कलादृष्टी आणि गणेशभक्तीची प्रचीती देते. संग्रहालयातील मयूरावर आरूढ गणेशमूर्ती, अलंकारांनी सजलेली उत्तर यादवकालीन गणेशमूर्ती तसेच शहाबादी दगडात कोरलेली आणि सोंड मोदकाला स्पर्श करताना दाखविलेली गणेशमूर्ती विशेष आकर्षण ठरतात.
तेरमधील मेंडेश्वर, तुंगेश्वर, कणकेश्वर महादेव, नरसिंह, अंबिका, चामुंडा, सिद्धेश्वर आणि कालेश्वर या (Ganesha Idol Heritage) मंदिरांमध्येही विविध कालखंडातील गणेशशिल्पे आढळतात. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांच्या सहअस्तित्वातून समृद्ध झालेल्या तेरच्या इतिहासाचा हा वारसा आजही जिवंत आहे. इतिहास अभ्यासक, शिल्पशास्त्राचे तज्ज्ञ आणि पर्यटकांसाठी हा ठेवा महत्त्वाचा ठरत आहे.
पुरातन गणेशमूर्ती वारसा
ऐतिहासिक वैभवाची साक्ष...तेर नगरीच्या मातीत जपला 21 पुरातन गणेशमूर्तींचा वारसा
Ganesha Idol Heritage: तेर नगरीच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष, विविध कालखंडातील 21 पुरातन गणेशमूर्ती आजही जतन करण्यात आल्या असून, गणेशाचे अंकन असलेली काही प्राचीन नाणीही येथे आढळली आहेत.
By :
देशोन्नती डिजीटल »
•
Ganesha Idol Heritage
टैग्स:
Ganesha Idol Heritage